नात्यांची वीण उसवली तर, परत विणून घेता येते,
पण, नात्यांच्या धाग्यांना कसर लागली तर?
विरूनच जातील ना ती ... नाती...?
Friday, August 22, 2008
पाचोळा...
वाट बघत बसले,
आदर्श वाट तयार होण्याची,
पण, हेच विसरले की,
वाट चालून चालून तयार होणार..
नुसती वाट बघून काय होणार.....?
आदर्श वाट तयार होण्याची,
पण, हेच विसरले की,
वाट चालून चालून तयार होणार..
नुसती वाट बघून काय होणार.....?
पाचोळा...
एखादे फूल, फुलदाणीतही उमलते, नव्याने,
पण, नाते, उमलते का असे, नव्याने?
अन्, त्याने गुंतागुंतच वाढेल ना, नव्याने?
पण, नाते, उमलते का असे, नव्याने?
अन्, त्याने गुंतागुंतच वाढेल ना, नव्याने?
पाचोळा...
संकटे, सांगून येत नाहीत कधी,
आणि, एकटीही..
हातात हात घालून येतात,
आणि, मुकाबला करण्याचे बळही ,
संकटेच देतात...
आणि, एकटीही..
हातात हात घालून येतात,
आणि, मुकाबला करण्याचे बळही ,
संकटेच देतात...
पाचोळा...
प्रदीर्घ काळ जावा लागतो,
न्याय मिळायला,
कधीकधी, जन्म देखील..
अन्याय, मात्र तात्काळ होतो...
न्याय मिळायला,
कधीकधी, जन्म देखील..
अन्याय, मात्र तात्काळ होतो...
Wednesday, August 6, 2008
पाचोळा...
Friday, March 07, 2008
झिजलेल्या वस्त्राला,
ठिगळ लावता येईल..
पण....विरलेल्या नात्यांना,
फाटलेल्या आभाळाला?
भेगाळलेल्या जमिनीला?
कसं रे?....
झिजलेल्या वस्त्राला,
ठिगळ लावता येईल..
पण....विरलेल्या नात्यांना,
फाटलेल्या आभाळाला?
भेगाळलेल्या जमिनीला?
कसं रे?....
पाचोळा...
Saturday, March 01, 2008
काट्याने निघतो काटा,
विषावर उतारा विषाचा,
तर, द्वेषाच्या पाण्याने,
द्वेष धुता येईल?...
काट्याने निघतो काटा,
विषावर उतारा विषाचा,
तर, द्वेषाच्या पाण्याने,
द्वेष धुता येईल?...
पाचोळा...
Monday, October 01, 2007
मेंदीभरल्या पाऊलीं,
पाणंदीला चढे लाली,
भाव-भावनांची नक्षी,
तीत खुबीने गुंफली...
मेंदीभरल्या पाऊलीं,
पाणंदीला चढे लाली,
भाव-भावनांची नक्षी,
तीत खुबीने गुंफली...
पाचोळा...
Monday, October 01, 2007
जीवनाच्या आडावरी,
घागरींचे येणे-जाणे,
हिंदळती कटीवरी,
सुखदु:खाचे उखाणे...
जीवनाच्या आडावरी,
घागरींचे येणे-जाणे,
हिंदळती कटीवरी,
सुखदु:खाचे उखाणे...
पाचोळा...
Monday, October 01, 2007
सूर्यदेवाच्या साथीने,
प्रकाशाचे येणे-जाणे,
सुखदु:खाचा हा खेळ,
उन-सावलीच्या रुपाने...
सूर्यदेवाच्या साथीने,
प्रकाशाचे येणे-जाणे,
सुखदु:खाचा हा खेळ,
उन-सावलीच्या रुपाने...
पाचोळा...
Tuesday, September 25, 2007
पुलाखालून धो-धो पाणी वाहून गेलं,
तरीही नदी वाहतेच आहे, दुथडी भरून,
डोळ्यांमधून अलोट अश्रू वाहून गेले,
तरीही हसू फुटतंय अजून, आतून, कुठून?
पुलाखालून धो-धो पाणी वाहून गेलं,
तरीही नदी वाहतेच आहे, दुथडी भरून,
डोळ्यांमधून अलोट अश्रू वाहून गेले,
तरीही हसू फुटतंय अजून, आतून, कुठून?
ठेच...
Tuesday, September 25, 2007
पाउलवाट नेहमीची,
पायाखालची, सवयीची,
तरीही आज ठेच लागली,
आठवण आली का कुणाची?...
पाउलवाट नेहमीची,
पायाखालची, सवयीची,
तरीही आज ठेच लागली,
आठवण आली का कुणाची?...
चित्तरकथा...
Wednesday, August 08, 2007
ओढाळ, वेड्या लाटांची,
चित्तरकथा प्रीतीची,
क्षणिक भेट किनार्याची,
पुन्हां वाट परतीची......
ओढाळ, वेड्या लाटांची,
चित्तरकथा प्रीतीची,
क्षणिक भेट किनार्याची,
पुन्हां वाट परतीची......
Tuesday, August 5, 2008
रंग...
Sunday, March 11, 2007
सत्याच्या प्रकाशात,
गोरा रंग,
आतून कुजलेला....
सत्याच्या प्रकाशात,
काळा रंग,
उमलून झळाळलेला....
सत्याच्या प्रकाशात,
गोरा रंग,
आतून कुजलेला....
सत्याच्या प्रकाशात,
काळा रंग,
उमलून झळाळलेला....
पाचोळा...
Tuesday, January 02, 2007
नाती....सारी स्वार्थापुरती,....
संबंध...दिल्या-घेतल्याचे....
कोणी न थांबे कोणासाठी....
सारे प्रवासी घडीचे.....
नाती....सारी स्वार्थापुरती,....
संबंध...दिल्या-घेतल्याचे....
कोणी न थांबे कोणासाठी....
सारे प्रवासी घडीचे.....
पाचोळा...
खरे?...
Subscribe to:
Posts (Atom)