खाचा-खळग्यांची वाट,
एकटीच चालले,
जमीन जास्त भेगाळलेली,
की त्याहून जास्त, पावले?.....
Monday, March 29, 2010
Saturday, September 20, 2008
जुनं...
प्रेम जुनं, पुस्तकही जुनं,
जुन्या पुस्तकासारखं, मनही सुनं,
गंधाच्या वाटेवर, जुळतील कां पुन्हां, मनं..?
जुन्या पुस्तकासारखं, मनही सुनं,
गंधाच्या वाटेवर, जुळतील कां पुन्हां, मनं..?
Friday, August 22, 2008
पाचोळा...
नात्यांची वीण उसवली तर, परत विणून घेता येते,
पण, नात्यांच्या धाग्यांना कसर लागली तर?
विरूनच जातील ना ती ... नाती...?
पण, नात्यांच्या धाग्यांना कसर लागली तर?
विरूनच जातील ना ती ... नाती...?
पाचोळा...
वाट बघत बसले,
आदर्श वाट तयार होण्याची,
पण, हेच विसरले की,
वाट चालून चालून तयार होणार..
नुसती वाट बघून काय होणार.....?
आदर्श वाट तयार होण्याची,
पण, हेच विसरले की,
वाट चालून चालून तयार होणार..
नुसती वाट बघून काय होणार.....?
पाचोळा...
एखादे फूल, फुलदाणीतही उमलते, नव्याने,
पण, नाते, उमलते का असे, नव्याने?
अन्, त्याने गुंतागुंतच वाढेल ना, नव्याने?
पण, नाते, उमलते का असे, नव्याने?
अन्, त्याने गुंतागुंतच वाढेल ना, नव्याने?
पाचोळा...
संकटे, सांगून येत नाहीत कधी,
आणि, एकटीही..
हातात हात घालून येतात,
आणि, मुकाबला करण्याचे बळही ,
संकटेच देतात...
आणि, एकटीही..
हातात हात घालून येतात,
आणि, मुकाबला करण्याचे बळही ,
संकटेच देतात...
Subscribe to:
Posts (Atom)