Saturday, September 20, 2008

जुनं...

प्रेम जुनं, पुस्‍तकही जुनं,
जुन्‍या पुस्‍तकासारखं, मनही सुनं,
गंधाच्‍या वाटेवर, जुळतील कां पुन्‍हां, मनं..?

Friday, August 22, 2008

पाचोळा...

नात्‍यांची वीण उसवली तर, परत विणून घेता येते,
पण, नात्‍यांच्‍या धाग्‍यांना कसर लागली तर?
विरूनच जातील ना ती ... नाती...?

पाचोळा...

वाट बघत बसले,
आदर्श वाट तयार होण्‍याची,
पण, हेच विसरले की,
वाट चालून चालून तयार होणार..
नुसती वाट बघून काय होणार.....?

पाचोळा...

खपली पडली मनावरची,
तेव्‍हांच जाणवलं,
अजून जखम आहेच मनाला,
खोलवर, भळभळणारी...

पाचोळा...

एखादे फूल, फुलदाणीतही उमलते, नव्‍याने,
पण, नाते, उमलते का असे, नव्‍याने?
अन्‌, त्‍याने गुंतागुंतच वाढेल ना, नव्‍याने?

पाचोळा...

संकटे, सांगून येत नाहीत कधी,
आणि, एकटीही..
हातात हात घालून येतात,
आणि, मुकाबला करण्‍याचे बळही ,
संकटेच देतात...

पाचोळा...

प्रदीर्घ काळ जावा लागतो,
न्‍याय मिळायला,
कधीकधी, जन्‍म देखील..
अन्‍याय, मात्र तात्‍काळ होतो...

पाचोळा...

काळ करतो घात,
काळच उडवतो छत,
काळ देतो छेद,
काळच बनतो औषध...

Wednesday, August 6, 2008

पाचोळा...

Friday, March 07, 2008

झिजलेल्‍या वस्‍त्राला,
ठिगळ लावता येईल..
पण....विरलेल्‍या नात्‍यांना,
फाटलेल्‍या आभाळाला?
भेगाळलेल्‍या जमिनीला?
कसं रे?....

पाचोळा...


Saturday, March 01, 2008


लढण्‍यासाठी, रडण्‍यासाठी,
आणि तिरडीसाठीही,
लागतोच की....खांदा...

पाचोळा...

Saturday, March 01, 2008


काट्‍याने निघतो काटा,
विषावर उतारा विषाचा,
तर, द्‍वेषाच्‍या पाण्‍याने,
द्‍वेष धुता येईल?...

पाचोळा...

Saturday, March 01, 2008


जगू शकतेय तुझ्‍याशिवाय,
पण मरणार मात्र नाही,
तुला पाहिल्‍याशिवाय...

पाचोळा...

Thursday, February 21, 2008

मन मरुन गेलंय,
तरी जगावं लागतंय,
छातीत ठोके वाजताय्‌त, तोवर...

पाचोळा...


Monday, October 01, 2007

दीप तेवे वृंदावनी,
सांज दाटली, दाटली,
आता येई परतुनी,
किती पाहू रे वाटुली?..

पाचोळा...

Monday, October 01, 2007

मेंदीभरल्‍या पाऊलीं,
पाणंदीला चढे लाली,
भाव-भावनांची नक्षी,
तीत खुबीने गुंफली...

पाचोळा...

Monday, October 01, 2007

जीवनाच्‍या आडावरी,
घागरींचे येणे-जाणे,
हिंदळती कटीवरी,
सुखदु:खाचे उखाणे...

पाचोळा...

Monday, October 01, 2007

सूर्यदेवाच्‍या साथीने,
प्रकाशाचे येणे-जाणे,
सुखदु:खाचा हा खेळ,
उन-सावलीच्‍या रुपाने...

पाचोळा...

Tuesday, September 25, 2007

पुलाखालून धो-धो पाणी वाहून गेलं,
तरीही नदी वाहतेच आहे, दुथडी भरून,
डोळ्‍यांमधून अलोट अश्रू वाहून गेले,
तरीही हसू फुटतंय अजून, आतून, कुठून?

ठेच...

Tuesday, September 25, 2007

पाउलवाट नेहमीची,
पायाखालची, सवयीची,
तरीही आज ठेच लागली,
आठवण आली का कुणाची?...

दिवे...

Saturday, August 18, 2007

गूढ अंधारात,
चमकणारे काजवे,
आशेचे दिवे....

बळ...


Saturday, August 18, 2007

अंधारात डोकावण्‍यानेच
बळ मिळते,
प्रकाशाकडे झेपावण्‍याचे....

दिवाणा...

Saturday, August 18, 2007

अवखळ लाटांचा,
रात्रभर धिंगाणा,
किनारा दिवाणा....

चित्तरकथा...

Wednesday, August 08, 2007

ओढाळ, वेड्‍या लाटांची,
चित्तरकथा प्रीतीची,
क्षणिक भेट किनार्‍याची,
पुन्‍हां वाट परतीची......

पाचोळा...

Monday, July 30, 2007

अवचित पाहिलं,
इकडे तिकडे,
तू मनात डोकावलास ना......

पाचोळा...


Monday, July 30, 2007

स्‍वप्‍नं.... जड होतात,
गरीबाच्‍या डोळ्‍यांना,
नि, सांडून जातात.....

पाचोळा...

Monday, July 30, 2007

वणव्‍याला घाबरुन,
धावतोय सैरावैरा,
भणाणता रानवारा........

Tuesday, August 5, 2008

पाचोळा...

Sunday, March 11, 2007

चमकदार डोळ्‍यात,
काजळाची रेघ,
निळ्‍यासावळ्‍या ढगावर,
विजेची रेघ.......

पाचोळा...

Sunday, March 11, 2007

काळीकुट्‍ट सावलीही,
विश्‍वास देते की,
मागे प्रकाश झगमगतोय..

रंग...

Sunday, March 11, 2007

सत्‍याच्‍या प्रकाशात,
गोरा रंग,
आतून कुजलेला....

सत्‍याच्‍या प्रकाशात,
काळा रंग,
उमलून झळाळलेला....

पाचोळा...

Thursday, February 08, 2007

स्‍मरणाच्‍या फुलांनी,
भरली ऒंजळ,
आता मात्र पानगळ...

पाचोळा...

Sunday, January 28, 2007


देवाच्‍या पायांवर,
फुलांची लयलूट,
वेलीपासून ताटातूट....

पाचोळा...

Sunday, January 28, 2007


टाकीच्‍या घणांनी,
घडली मूर्ती,
देवाची आरती...

पाचोळा...

Tuesday, January 02, 2007


नाती....सारी स्‍वार्थापुरती,....
संबंध...दिल्‍या-घेतल्‍याचे....
कोणी न थांबे कोणासाठी....
सारे प्रवासी घडीचे.....

पाचोळा...

Tuesday, January 02, 2007



अंतर्यामी निरोप मिळता,
घास हातीच राहिला...
आयुष्‍याच्‍या ताटावरुन,
ज्‍याची वेळ आली, तो उठला......

पाचोळा...

Monday, June 19, 2006


प्रवाहात पडल्‍यावर,
पाचोळ्‍याचं एक बरं असतं..
दिशाही मिळते,
आणि नशाही.......

पाचोळा...

Monday, June 19, 2006


आयुष्‍याच्‍या प्रवाहात...
पोहणं कमी,
वाहवणंच जास्‍त....

पाचोळा...

Sunday, June 18, 2006



आलो मी एकला,
जाणारही एकला,
एकांत येथला,
का न साहे....?

खरे?...

Friday, June 16, 2006

खर्‍याच्‍या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........